शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा मच्छिमारांच्यावतीने आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:43 IST

देवगड : शासनाने मच्छिमारांना मिळणाऱ्या डिझेल परताव्याबाबत गांभीर्याने विचार करावा व लोकप्रतिनिधीनींही याची दखल घ्यावी. अन्यथा आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालून मच्छिमारांच्यावतीने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देवगडमधील मच्छिमार नेते भाई खोबरेकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देभाई खोबरेकर यांचा इशारा : डिझेल परताव्याबाबत गांभीर्याने विचार करावा

देवगड : शासनाने मच्छिमारांना मिळणाऱ्या डिझेल परताव्याबाबत गांभीर्याने विचार करावा व लोकप्रतिनिधीनींही याची दखल घ्यावी. अन्यथा आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालून मच्छिमारांच्यावतीने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देवगडमधील मच्छिमार नेते भाई खोबरेकर यांनी दिला आहे.सर्वसामान्य मच्छिमार कर्जबाजारी झाला आहे. शेतकºयांनी आत्महत्या केली की त्याची दखल घेतली जाते. परंतु मत्स्यव्यवसाय हा शेतीपूरक व्यवसायामध्ये मोडत असतानाही त्याची दखल घेतली जात नाही. म्हणून मच्छिमारांच्या आत्महत्या होण्याची वाट शासन पहात आहे का ? असा सवाल खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे.महाराष्ट्र शासन मच्छिमारांना लागणाºया डिझेलवर परतावा देते. स्थानिक मच्छिमार सोसायटींच्या माध्यमातून उचल करण्यात येणाºया डिझेल खरेदीवर त्या महिन्यातील दराच्या अनुषंगाने शासनाकडून मच्छिमारांना प्रतिलिटर ९ ते १० रुपये परतावा देण्यात येतो. मात्र हा परतावा वेळेत दिला जात नाही. या परताव्यावरच मच्छिमारांची सध्या आर्थिक उलाढाल सुरू राहिली आहे. हा परतावाच मच्छिमारांची आर्थिक उलाढाल राहिली आहे.दरम्यान, शासनाकडून सन २०१७ पासून मच्छिमारांना डिझेलवरील परतावा रक्कम देय असताना सप्टेंबर महिन्यातील परतावा रकमेला मंजुरी देण्यात आली. या महिन्यात गणेश चतुर्थी असल्यामुळे बहुतांशी नौका बंद असतात. काही नौका या सणानंतरच मच्छिमारीसाठी पाण्यात उतरतात. त्यामुळे या महिन्यात डिझेल अत्यंत कमी प्रमाणात उचलले जाते. त्यामुळे साहजिकच डिझेल परताव्याची रक्कमही अत्यल्प असते.मत्स्य व्यवसाय अधिकाºयांनी मागील तेरा महिन्यांचा डिझेल परतावा देय असताना फक्त सप्टेंबर महिन्याची परताव्याची रक्कम मंजूर करून एकप्रकारे मच्छिमारांची क्रूर चेष्टा केली आहे व मच्छिमारांच्या तोंंडाला पाने पुसली आहेत.अशा विचित्र स्थितीत मच्छिमार असताना शासनाने मच्छिमारांना मिळणाºया डिझेल परताव्याबाबत तरी गांभीर्याने विचार करावा. अन्यथा मच्छिमारांना जनआंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा भाई खोबरेकर यांनी दिला आहे.